बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 22 कोरोनाबाधितांची नोंद

नागपूर | महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातून आता दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे.

नागपूर जिल्ह्यात आज 22 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच आतापर्यंत 04 लाख 77 हजार 396 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. आज दिवसभरात नागपूरमध्ये अवघ्या 02 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 9 हजार 038 कोरोनाबाधितांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्युु झाला आहे.

नागपुरमधील कोरोना हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज एकूण 17 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत 4 लाख 68 हजार 248 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. सध्या नागपूर हे कोरोनामुक्त होत असलं तरीही प्रशासनातर्फे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नागरिकांना लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात येत आहे. तसेच पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील अनलॉकला सुरुवात झाली आहे. दर आठवड्याला जिल्ह्याचा आढावा घेऊन संबंधित जिल्ह्याचे स्तर प्रशासनातर्फे ठरवण्यात येत होते. पण आता कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या व्हायरसने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

 

 

थोडक्यात बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More