बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा, 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यु नाही

नागपूर | गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला होता. दुसऱ्या लाटेत तर कोरोनाने रौद्र रूप प्राप्त केलं होतं आणि त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला. एकेकाळी नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आता नागपूरकरांना कोरोनातून काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

नागपूरमध्ये 24 तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर नागपुरमधील मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असताना पाहायला मिळत आहे. नागपूरकरांना कोरोनामधून आता दिलासा मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे. आज 22 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच 69 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मागच्या आठवड्यातील नागपुरमधील कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा 0.15 टक्के असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागपूरमधील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येत आहेत. पण सध्या कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असली तरी प्रशासनाकडून नागरिकांना सर्व नियम पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 76 हजार 984 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे 9 हजार 025 नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सध्या महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात झाली आहे. तसेच विविध भागांमध्ये नागरिकांना लॉकडाऊनमधून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन सूट देण्यात येत आहे. पण आता नव्या विषाणुने डोकं वर काढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

मोठी बातमी! ‘या’ राज्यात 6 जुलैपासून शिक्षण संस्था चालू होणार; वाचा काय आहेत गाईडलाईन्स

खासदार नुसरत जहाॅंनं बेबी बम्पसोबत शेअर केले खास फोटो

आजपासून ‘या’ जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन खुल्या बाजारात मिळणार

“गोपीचंद पडळकर बांडगुळ आहे आणि अशी बांडगुळं वाढत आहेत”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More