बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागपूरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; आज फक्त 196 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नागपूर | गेल्या वर्षीपासून कोरोनाने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर पहिल्या लाटेपासूनच कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागपूरमधील नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात नागपूरमध्ये एकूण 941 जणांनी कोरोनावर मात केली आहे. नागपूरमध्ये आज दिवसभरात अवघ्या 196 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 10 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

आतापर्यंत नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. पण आता आकडा हळुहळु आटोक्यात येत असल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी कोरोनाचं हाॅटस्पाॅट बनलेल्या नागपूरमधुन आता दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 8959 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. पण आता रूग्णसंख्या कमी असलेल्या भागामध्ये शिथीलता देण्यात येत आहे. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम हळूहळू महाराष्ट्रातील विविध भागांमधून पाहायला मिळत आहे. विविध भागांमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात अनलाॅकला सुरूवात झाली आहे.

थोडक्यात बातम्या – 

देशातील ‘या’ राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; उद्यापासून होणार अनलॉकला सुरुवात

पुणेकरांसाठी खूशखबर! अखेर ‘या’ मार्गे पुण्यात झालं मान्सूनचं आगमन

टीम इंडीयाच्या ‘या’ अनुभवी खेळाडूनं किचनमध्ये दाखवली आपल्या हाताची जादू; पाहा व्हिडीओ

WTC च्या फाईनलची तयारी करणाऱ्या विराटबद्दल अनुष्कानं भन्नाट कॅप्शन देत पोस्ट केला ‘हा’ फोटो

‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रूग्णांना आवश्यक असलेल्या इंजेक्शनसाठी रुग्णालयाला द्यावं लागणार हमीपत्र

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More