बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 150च्या खाली

नागपूर | गेल्या वर्षीपासून कोरोनाने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर पहिल्या लाटेपासूनच कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागपूरमधील नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात नागपूरमध्ये एकूण 430 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

नागपूरमध्ये आज दिवसभरात अवघ्या 134 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 8 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. आतापर्यंत नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत होती पण आता आकडा हळुहळु आटोक्यात येत असल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी कोरोनाचं हाॅटस्पाॅट बनलेल्या नागपूरमधुन आता दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. पण आता रूग्णसंख्या कमी असलेल्या भागामध्ये शिथीलता देण्यात येत आहे. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम हळूहळू महाराष्ट्रातील विविध भागांमधून पाहायला मिळत आहे. विविध भागांमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“लसीबाबत शंका उपस्थित करणारे भोळ्याभाबड्या बहीण-भावांच्या जीवनाशी खेळ करत आहेत”

ब्रेकिंग! पुण्यात सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, पाहा व्हिडीओ

देशातील खासगी रुग्णालयात ‘या’ किंमतीपेक्षा अधिक किमतीत लस विकता येणार नाही; पंतप्रधानांची घोषणा

पंतप्रधान गरीब योजनेतून ‘या’ महिन्यापर्यंत जनतेला मिळणार मोफत राशन

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More