बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला कोरोनातून मोठा दिलासा; मृत्यूचं प्रमाण कमी होऊन बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

नागपूर | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत होती. त्यातच नागपूर हे पहिल्या लाटेपासूनच कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं होतं. परंतु, आता नागपूरमधून काही प्रमाणात दिलासादायक बातमी समोर येत आहे.

आज नागपूरमधील कोरोना परिस्थिती दिलासादायक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये कोरोना मृत्यूचं प्रमाण कमी झालं असून दररोज नोंदवणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात आज 3 हजार 405 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आज एकाच दिवसात 1150 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद नागपूरमध्ये झाली असून 28 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने काही प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

नागपूरमध्ये आतापर्यंत 4 लाख 67 हजार 931 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यापैकी 4 लाख 40 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत नागपूरमध्ये 8 हजार 685 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाहायला मिळत आहे. हळूहळू कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढत असल्याने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्तीच्या वाटेवर जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या –

हा भेदभाव का?, दुसऱ्या राज्यांमधील जनतेच्या प्रति आपली जबाबदारी नाही का?- पृथ्वीराज चव्हाण

महत्त्वाची बातमी! कोरोनाचा संसर्ग हवेतून होण्याचा धोका, केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

मोठी बातमी! रेमडेसिविर इंजेक्शन आता कोरोना रूग्णांना दिलं जाणार नाही; WHO ने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

भारताच्या प्रमुख गोलंदाजावर दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे वडिलांचं निधन

पुणे | भाच्याने मामाला घातला गंडा, रक्कम ऐकून हैराण व्हाल

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More