कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट
नागपूर | गेल्या वर्षीपासून कोरोनाने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर पहिल्या लाटेपासूनच कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागपूरमधील नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात नागपूरमध्ये एकूण 2 हजार 326 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
नागपूरमध्ये आज दिवसभरात 1 हजार 042 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 24 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. आतापर्यंत नागपूरमध्ये एकूण 4 लाख 71 हजार 059 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत 4 लाख 48 हजार 357 जण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.
नागपूरमध्ये आतापर्यंत 8 हजार 768 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जूनपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम हळूहळू महाराष्ट्रातील विविध भागांमधून पाहायला मिळत आहे. विविध भागांमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
टॅक्सी चालकाने भाडं नाकारलं अन् त्याच्यासोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; रिकव्हरी रेट 92.12 टक्यांवर
“महाराष्ट्राच्या हितासाठी कटूपणा घ्यायची माझी तयारी आहे”; मुख्यमंत्र्यांचं लॉकडाऊनबाबत मोठं वक्तव्य
दिलासादायक! मुंबईतील सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आजची आकडेवारी
11 हजारांसाठी रुग्णालयाने ठेवून घेतलं महिलेचं मंगळसूत्र; माणुसकीला काळीमा फासणारी घटना
Comments are closed.