बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागपूरात आज आढळले फक्त 203 नवे रूग्ण; कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

नागपूर | गेल्या वर्षीपासून कोरोनाने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर पहिल्या लाटेपासूनच कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागपूरमधील नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात नागपूरमध्ये एकूण 833 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

नागपूरमध्ये आज दिवसभरात अवघ्या 203 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 12 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. आतापर्यंत नागपूरमध्ये एकूण 4 लाख 74 हजार 808 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत 4 लाख 60 हजार 275 जण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. एकेकाळी कोरोनाचं हाॅटस्पाॅट बनलेल्या नागपूरमधुन आता दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

नागपूरमध्ये आतापर्यंत 8 हजार 914 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जूनपर्यंत लॉकडाऊन घोषित केला होता. परंतू, तो आता 15 दिवस आणखी वाढवणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यांनी दिली आहे. तसेच लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम हळूहळू महाराष्ट्रातील विविध भागांमधून पाहायला मिळत आहे. विविध भागांमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

‘ही’ एक गोष्ट कोरोना संक्रमणामध्ये मृत्यूचा धोका कमी करते, NIMSचा मोठा दावा

बाप की हैवान? पत्नीने जेवण न वाढल्याच्या रागात 9 महिन्याच्या चिमुकलीची हत्या

लग्नात स्टेजवर जाण्याआधीच नवरीनं केला हवेत गोळीबार, पाहा व्हायरल व्हिडीओ

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी

“मायनसमध्ये जीडीपी, इंधन दरवाढ हे दोनदा निवडून दिल्यामुळे केंद्र सरकारचं रिटर्न गिफ्ट आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More