बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यु नाही

नागपूर | महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातून आता दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे.

नागपूर जिल्ह्यात आज अवघ्या 24 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच आतापर्यंत 04 लाख 77 हजार 008 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. आज दिवसभरात नागपूरमध्ये एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 9 हजार 025 कोरोनाबाधितांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्युु झाला आहे.

नागपुरमधील कोरोना हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज एकूण 54 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत 4 लाख 67 हजार 587 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. सध्या नागपूर हे कोरोनामुक्त होत असलं तरीही प्रशासनातर्फे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नागरिकांना लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात येत आहे. तसेच पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील अनलॉकला सुरुवात झाली आहे. दर आठवड्याला जिल्ह्याचा आढावा घेऊन संबंधित जिल्ह्याचे स्तर प्रशासनातर्फे ठरवण्यात येत आहेत. पण आता डेल्टा प्लस व्हायरस डोकं वर काढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या

‘बिग बॉस 15’ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन, म्हणाली….

‘आमच्या आमदाराला त्रास देत असतील तर…’; शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

‘नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे’; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरुन नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

62 वर्षीय व्यक्तीनं केली डेल्टा प्लस व्हेरिएंटवर मात, अनुभव सांगताना म्हणाला…

“देवेंद्र फडणवीस खोटं बोलण्याचं मशीन, चार महिन्यात आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनीच ओबीसींचं आरक्षण काढलं”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More