बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाकाळात ‘या’ शहरातील खासगी रुग्णालयाविरूध्द तब्बल 580 तक्रारी, 496 लागल्या निकाली

नागपूर | कोरोनाकाळामध्ये खासगी रुग्णालयांनी रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट केल्याच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या. त्यातच नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल 580 खासगी रुग्णालयांच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात लूट केली तसेच अवाजवी बिल देऊन रुग्णांची फसवणूक देखील केली. यासंबंधी 580 तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेने याची तात्काळ स्वरूपात गंभीर दखल घेतली आहे.

कोरोना काळात खासगी रुग्णालयांच्या विरुद्ध मिळालेल्या 580 तक्रारीपैकी 496 तक्रारी या महानगरपालिकेने निकाली काढल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेने दिली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महानगरपालिकेने यासंबंधीचं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.  त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये खासगी रुग्णालयांनी रुग्णांना सहज त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक व लूट केल्याच्या अनेक घटना घडल्या त्यातच सरकारने खासगी रुग्णालयांच्या बिलाच ऑडिट करण्यात येईल असं स्पष्ट केलं होतं. नागपूर महानगपालिकेला प्राप्त तक्रारी पैकी तब्बल 90 टक्के तक्रारी पालिकेने निकाली लावल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More