‘त्या’ गाण्यामुळं रॅपर बादशाहाला नागपूर न्यायालयाची नोटीस

नागपूर | आपल्या दमदार आवाजाने गायक-रॅपर बादशाहाने (Badshah) उर्फ आदित्य प्रतीकसिंह सिसोदियाने(Aditya Pratik Singh Sisodiya) आजच्या तरुणाईला त्याच्या नवनवीन गाण्याने अक्षरशः वेड लावलंय. अगदी लहान मुलं सुद्धा त्याचे फॅन आहेत.

सोशल मीडियावर बादशाहाची मोठी फॅन फॅोलोईंग आहे. मात्र आता बादशाहच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढंच नव्हे तर हे प्रकरण न्यायालयापर्यंत सुद्धा गेलं आहे.

बादशाहाने अश्लील गाणे गायल्याचा आरोप लावण्यात आला आहे. दरम्यान बादशाहाला या आधी न्यायलयात बोलावले होते. मात्र त्यांनी हजरे लावली नाही. आता त्याला उत्तर देण्याची अंतिम संधी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. जाधव यांनी दिली आहे. अन्यथा, त्याची बाजू न ऐकताच निकाल दिला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पाचपावली पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी प्रसिद्ध गायक हनी सिंग (Honey Singh) याच्या आवाजाचे सुद्धा नमुने पोलिसांनी घेतले आहेत.

मात्र, बादशाहाचे नमुने मिळाले नाहीत. त्याच्या आवाजाचे नमुने घ्यावेत यासाठी तक्रारकर्ते आनंदपाल सिंग गुरुपालसिंह जब्बाल यांनी त्यांचे वकील रसपाल रेणू यांच्यामार्फत अर्ज केला आहे.

थोडक्यात बातम्या-

लेक अथियापेक्षाही भन्नाट आहे सुनील शेट्टीची लव्हस्टोरी!

मोठी बातमी! ‘या’ राज्यांना भूकंपाचे झटके

‘मला तुरुंगात…’, मविआबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

”मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही हे मला माहित होतं.”

बागेश्वर महाराजांचा लग्नाबाबत मोठा खुलासा!