पुण्यानंतर नागपुरातही ‘हिट अँड रन’, मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवलं

Nagpur Crime News | राज्यात सध्या पुणे अपघात प्रकरणामुळे संताप व्यक्त केला जातोय.पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने दोघांना दारूच्या नशेत कारने चिरडलं. यात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी रोज धक्कादायक अपडेट समोर येत आहे.

अल्पवयीन आरोपी मुलाला 15 तासांच्या आत जामीन दिल्याने संताप व्यक्त केला जातोय. त्यातच पुणे पोलिसांवर देखील प्रश्न केले गेले. यात राजकीय नेत्यांनीही उडी घेतलीये. महाविकास आघाडीकडून या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातंय. अशात नागपुरातही ‘हिट अँड रन’ची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवलं

काही मीडिया रिपोर्टनुसार नागपुरात रात्री मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवल्याची घटना समोर आली आहे. नागपूर पोलिसांनी या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक केलीये. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. त्यात एक महिला, एक पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे.

नागपुरात झेंडा चौकामध्ये शुक्रवारी(Nagpur Crime News) रात्री हा अपघात घडला. सन्नी चव्हाण, अंशुल ढाले, आकाश निमोरिया अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे असून ते तिघेही मद्यधुंद असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीच्या गाडीतून बिअरच्या बाटल्या मिळाल्या

या अपघातामध्ये चिमुकल्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना रुग्णालयात दाखल केले. याशिवाय तपास करीत तिघांनाही ताब्यात घेतलं आहे.त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस आता (Nagpur Crime News) अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी कारचालक सह कारमध्ये बसलेल्या इतर तरुणांना देखील ताब्यात घेतलं आहे. त्यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आलंय. तसेच त्यांच्या गाडीतून बिअरच्या बॉटल सुद्धा मिळाल्या आहेत. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

News Title :  Nagpur Crime News accident case 

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

अग्रवालांनी ड्रायव्हरला डांबून ठेवलं!, धक्कादायक घटनाक्रम आला समोर; पोलिसांकडून आता आजोबाला अटक

आज या राशीच्या व्यक्तींनी प्रवास टाळावा

डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकावर मोठी कारवाई!

भर स्टेडियममध्ये जान्हवी कपूरसोबत घडला धक्कादायक प्रकार, व्हिडीओ तूफान व्हायरल