मुख्यमंत्र्यांच्या घरापासून 200 मीटरवर मोठी घरफोडी

नागपूर | मुख्यमंत्र्यांच्या घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर भरदिवसा मोठी घरफोडी झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या नागपुरात त्यातही घराजवळच सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचं दिसतंय. 

परांजपे असं घरफोडी झालेल्या घराचं नाव आहे. चोरट्यांनी लाखो रुपयांचं सोनं लंपास केलंय. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. 

दरम्यान, सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे 5 हजार पोलीस सध्या नागपुरात बंदोबस्ताला आहेत. अशा परिस्थितीत एवढी मोठी चोरी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.