बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा दर 97.90 टक्क्यांवर

नागपूर | दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात येत असताना महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात झाली.

एकेकाळी कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातून आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये नागपूरमध्ये कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसेच कोरोनामुक्तीचा दर हा 97.90 टक्क्यांवर पोहोचल्याने नागरिकांसह प्रशासनाने सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे.

दुसऱ्या लाटेत नागपूरमध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं होतं. पण आता ही रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. काल एका दिवसात फक्त 16 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद नागपूरमध्ये झाली. तसेच सध्या 1002 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील अनलाॅकला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये नागपूर जिल्हा हा पहिल्या टप्प्यात आला असून पूर्णपणे निर्बंध अद्याप नागपूरमध्ये हटवण्यात आलेले नाहीत. तसेच नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येताना आता पाहायला मिळत आहे. कारण नागपुरमधील कोरोना जवळपास आटोक्यात आल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारांच्या आत, मृतांचा आकडाही घटला

स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसनं आधी गोंधळातून बाहेर यावं – संजय राऊत

‘या’ महापालिकेतील तब्बल 1300 कर्मचारी कोरोनाबाधित; 27 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांची प्रकृती नाजूक; डॉक्टर म्हणतात…

पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची कडेकोट नाकाबंदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More