“कायदा आणि नियम फक्त सामान्य माणसांना छळण्यासाठी आहेत काय?”

Nagpur Drink and Drive Case | राज्यात सध्या पुणे अपघात प्रकरण चर्चेत आहे. पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलाने दोघांना दारूच्या नशेत कारने चिरडलं होतं. या प्रकरणी अग्रवाल कुटुंबातील तिघांना अटक झालीये. हे प्रकरण चर्चेत असतानाच नागपुरात देखील ‘हिट अँड रन’ची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

नागपुरात रात्री मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवल्याची घटना समोर आली आहे. नागपूर (Nagpur Drink and Drive Case) पोलिसांनी या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक केलीये. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. त्यात एक महिला, एक पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे. या प्रकरणी काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांना संतापजनक सवाल करण्यात आलाय.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar) यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिलीये. त्यांनी कायदा आणि नियम फक्त सामान्य माणसांना छळण्यासाठी आहेत का?, असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) विचारला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

पुणे नंतर काल नागपूर येथे सुद्धा ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण घडले आहे. अपघातातील आरोपींच्या गाडीत दारूच्या बाटल्या आणि अमली पदार्थ असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ड्रग सहज उपलब्ध होत असल्याबाबत मुद्दा मागील अधिवेशनात आम्ही मांडला होता. वारंवार प्रश्न उपस्थित करून सरकारचे आणि गृह विभागाचे लक्ष याकडे वेधले. त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे आता दिसत आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, “इतरवेळी ट्रॅफिक पोलिस अलर्ट असतात मग दारू पिऊन, ड्रग सेवन करून गाडी चालवणाऱ्या बेधुंद आरोपींकडे पोलिसांचे लक्ष नाही का? की कायदा आणि नियम फक्त सामान्य माणसांना छळण्यासाठी आहे?”, असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केलाय.

“मागील 2 वर्षात नागपूर क्राईम कॅपिटल (Nagpur Drink and Drive Case) म्हणून ओळखली जाते आहे. त्यात असे अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याने सामान्य नागरिकांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झाला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनांना गांभीर्याने घेऊन कठोर कारवाई करावी”, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केलीये.

News Title : Nagpur Drink and Drive Case Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या-

शिखर धवन ‘या’ महिला क्रिकेटरशी करणार दुसऱ्यांदा लग्न?; स्वतःच केला मोठा खुलासा

ग्राहकांनो खरेदीची करा घाई! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, ‘या’ लिंकवर पाहा गुण

बायकोमुळे हार्दिक पांड्या कंगाल होणार?, सोशल मीडियावर एका गोष्टीची जोरदार चर्चा

पुण्यानंतर नागपुरातही ‘हिट अँड रन’, मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवलं