शेतात विष प्राशन करुन शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

नागपूर | शेतात कामाला गेलेल्या चंद्रभान कुंभरे नावाच्या शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केलीय. हिंगणा तालुक्यातील येरणगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 

चंद्रभान आपली बैलजोडी घेऊन सकाळी शेतात गेले होते. याठिकाणी त्यांनी विषप्राशन केलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. शेतातच असलेल्या शेतमजुरांनी त्यांना रुग्णालयात हलवलं. मेडिकल कॉलेज रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, कर्जबाजारी असल्याने चंद्रभान यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला अशी त्यांच्या गावात चर्चा आहे.