बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महागडे सॅनिटायझर खरेदी करू नका आणि मास्कही वापरू नका; तुकाराम मुंढेंनी सांगितल्या सोप्या टिप्स

नागपूर | कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी नागरिक महागडे सॅनिटायझर खरेदी करत आहेत तर N-95 मास्क खरेदी करत आहेत. मात्र महागडे सॅनिटर आणि मास्क खरेदी करण्याची गरज नाही, असं म्हणत नागपुरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्वसामान्यांना सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे निश्चित काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र मास्कच्याऐजवी रूमालाचा वापर केला तरी फायद्याचं ठरेल आणि सॅनिटायझरऐवजी साबणाने जरी स्वच्छ हात धुतले तरी चालेल, असं त्यांनी सांगितलं आहे.

वारंवार साबनाने हात स्वच्छ करा. घरबसल्या काम करा. इथून पुढचे थोडे दिवस घराबाहेर पडू नका, स्वत:ची काळजी घ्या आणि तंदुरूस्त रहा, अशा सोप्या टिप्स त्यांनी नागरिकांना दिल्या आहेत.

दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्ताचा आकडा 42 वर गेला आहे. मुंबईत 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

“50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम न दिल्यास कंपनीवर कारवाई करणार”

संसार करत करत अभ्यास… पीएसआयच्या परीक्षेत ‘तिने’ मिळवलं घवघवीत यश!

लग्न करू शकता बरं का… लग्न समारंभावर बंदी नाही- पुणे जिल्हाधिकारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More