बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जमत नसेल तर घरी जा, हॉस्पिटलला उकिरड्याची अवकळा पाहून तुकाराम मुंढेंचा संताप

नागपूर | नागपूर महापालिका हॉस्पिटलला आलेली उकिरड्याची अवकळा पाहून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा चांगलाच संताप झाला. काम करायचं नसेल तर घरी जा, असा सक्त इशारा मुंढे यांनी डॉक्टरांना दिला.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा क्लास घेतला. ‘नागपूर महापालिकेचं सर्वात चांगलं रुग्णालय उकिरड्यासारखं झालं आहे, हे खपवून घेणार नाही’ अशी ताकीद तुकाराम मुंढे यांनी दिली.

‘महापालिकेचे काही डॉक्टर नीट प्रॅक्टिस करत नाही, ज्यांना जमत नसेल त्यांनी घरी जावं’ अशा शब्दात तुकाराम मुंढे यांनी वॉर रुममध्येच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झापलं.

दरम्याान, प्रशासनातली गोपनीय माहिती बाहेर पडते, यावरही मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘कोरोना’शी लढण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

गरीब कष्टकऱ्यांच्या देवाचीही कोरोनाच्या लढ्यात मदत; विठ्ठल मंदिराकडून 1 कोटींची मदत

कोटक बँकेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 कोटींची घसघशीत मदत

महत्वाच्या बातम्या-

खासगी वैद्यकीय सेवा अबाधित ठेवा, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा- तुकाराम मुंढे

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं नुकसान होतंय हे पाहून जर्मनी राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केली आत्महत्या!

धोक्याचा इशारा… रविवारी एकाच दिवशी तब्बल 22 कोरोनाग्रस्तांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More