नागपूर | नागपूर महानगरपालिकेत भाजपचं वर्चस्व असल्यानं महापौर आणि उपमहापौर हा भाजपचाच होणार असल्याचं दिसतंय.
आज महापौर, उपमहापौरांची निवड ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्यानं सत्ताधाऱ्याचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी 11 वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
महानगरपालिकेच्या मुख्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्या माध्यमातून ही निवडणूक घेतली जाणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर विद्यमान महापौर संदीप जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला.
भाजपकडून महापौर पदासाठी दयाशंकर तिवारी यांनी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौरपदासाठी मनिषा धावडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
थोडक्यात बातम्या-
….म्हणून त्याने भररस्त्यावर गर्लफ्रेंडवर गोळी झाडून नंतर स्वत: आत्महत्या केली; मुंबईतील घटनेने खळबळ
शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर?
कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल- रोहित पवार
पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा!
‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; शिवसेनेची गुजराती मतदारांना साद