तू फक्त माझी हो!, पोलीस अधीक्षकाची महिला कॉन्स्टेबलला 1 कोटी रुपयांची ऑफर

नागपूर | शारीरिक संबंधासाठी 1 कोटी रुपये रोख, पुण्यात चांगल्या परिसरातील इमारतीत प्रशस्त फ्लॅट, आलिशान कार देण्याची ऑफर महिला शिपायास दिल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यावर हा आरोप आहे. 

महिला शिपायानं ही ऑफर धुडकावून अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकूण लागताच रजा टाकून गायब झाले आहेत. 

पीडित 29 वर्षीय महिला शिपाई 2016 मध्ये प्रतिनियुक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात दाखल झाली. पोलिस अधीक्षक प्रद्मुम्न पाटील हे 2017 मध्ये या विभागात रुजू झाले. तिला बघताच पाटील त्यांचा तिच्यावर जीव जडला.

पाटलांनी तिच्यासोबत घसट सुरु केली. एकदा केबीनमध्ये बोलावून तू स्वामी समर्थाची भक्त आहेस. तू माझी व्हावी अशी स्वामींचीसुद्धा इच्छा आहे, असं पाटील म्हणाल्याचे तक्रारीत नोंदविले आहे. 

एकदा त्यांनी तिला कॉल करून “मला अंघोळ करून दाखव’ अशी अजब मागणी केली होती. अधीक्षक पाटील हे चित्रकार असल्याने महिलांची अश्‍लील छायाचित्रे तयार करून ते महिला शिपायाला पाठविॉत होते, असा आरोप करण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“सरकारने अगोदर माणसांकडं पाहावं, मग मंदिराकडे लक्ष दयावं”  

-सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 17 टक्के पगारवाढ?

-“शिवस्मारकाची उंची प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा जास्त असावी”

-मोदी-शहांचं टेंशन वाढलं; केंद्रीय मंत्री उद्या ‘एनडीए’तून बाहेर पडणार???

-फोर्ब्ज इंडियाची यादी जाहीर; पहा कोण आहे सर्वात श्रीमंत भारतीय…