बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बलात्कार केल्यानंतर तक्रार द्यायला या!, नागपूर पोलिसांचं धक्कादायक उत्तर

नागपूर | गुंडाने बलात्कार केल्यानंतर तक्रार करायला या, धमकी दिल्यानंतर नाही, असं धक्कादायक उत्तर नागपूर पोलिसांनी एका तरूणीला दिलंय. अमिता जयस्वाल ही तरूणी तक्रार करायला गेल्यानंतर पोलिसांनी तिला असं उत्तर दिलं.

सक्करदरा परिसरात राहणाऱ्या अमितानं अतिक्रमणाविरोधात काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. त्यानंतर तिच्या घरवर दगडफेक व्हायला लागली, शिव्या, बलात्काराच्या धमक्या यायला लागल्या. त्यावर पोलिसांनी कोणतीही पावलं उचलली नाहीत.

नुकतचं सांगली पोलिसांचं प्रकरण ताजं असतानाच गृहमंत्री फडणवीसांच्याच शहरात पोलिसांच्या अशा मानसिकतेमुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित होतेय.

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More