भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरी चोरी

नागपूर | भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या नागपुरातील घरी चोरी झालीय. ४५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि एक मोबाईल चोरट्यांनी लंपास केलाय. 

उमेश यादव कुटुंबासोबत पार्टीसाठी बाहेर गेला होता. घरी परतल्यानंतर आपल्या घरात चोरी झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.

दरम्यान, याप्रकरणी उमेश यादवनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या