Top News देश नागपूर महाराष्ट्र

सेक्स पोजिशन ट्राय करण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण

नागपूर | पॉर्न क्लिप पाहून त्याप्रमाणे सेक्स पोजिशन करण्याच्या नादात नागपूरच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

पॉर्न व्हिडीओ क्लीपच्या आडून आपल्या मुलाचा खून झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला असून तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

दोघांचे प्रेमसंबंध माहीत होते-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मृत तरुण २७ वर्षांचा असून तो इंजिनिअर होता. तो विवाहित  देखील होता. दोन वर्षांपासून त्याचे एका २६ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्याच्या या प्रेम संबंधाबद्दल त्याच्या घरच्यांना माहिती होती.

गुरुवारी तो छोट्या मुलाला घेऊन दवाखान्यात जाणार होता. मात्र दुपारी मुलीचा फोन आल्यानंतर त्याने अर्जंट काम निघाले असून सावनेरला जाणार असल्याचं कुटुंबियांना सांगितलं होतं.

रात्री तो घरी परतला नाही. घरच्यांनी त्याला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा घरचे चिंतेत पडले होते. अखेर रात्री फोन आल्यानंतर त्यांना अपघाताविषयी माहिती मिळाली.

नेमकं काय घडलं होतं?

मृत तरुण आणि २६ वर्षीय तरुणी यांचे प्रेमसंबंध होते. त्यांनी बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला होता. त्यानूसार ते दहेगाव हद्दीतील एका लॉवर गेले होते. तेथे त्यांनी एक खोली बुक केली होती.

खोलीवर गेल्यानंतर त्यांनी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी पोर्न क्लीप पाहून त्यांनी वेगवेगळ्या सेक्स पोजिशन ट्राय करण्याचा प्रयत्न केला.

तरुण खुर्चीवर बसल्यानंतर दोरीच्या सहाय्याने त्याचे हातपाय बांधण्यात आले होते. यावेळी त्याच्या गळ्याभोवती देखील दोरी होती.

या पोजीशनमध्ये सेक्स झाल्यानंतर तरुणी बाथरुममध्ये गेली होती. यावेळी तरुण खुर्चीसह खाली कोसळला. गळ्याभोवती असलेल्या दोरीचा फास बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

तरुणी बाथरुममधून बाहेर आल्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला. तिनं लॉज व्यवस्थापकाला याबद्दल माहिती दिली. त्याने पोलिसांना कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, तरुणाचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र आता मृत तरुणाच्या कुटुंबाने खुनाचा आरोप केल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

एका बायकोवरुन दोन जणांच्या गटात तुफान हाणामारी; सहा जणांना अटक

भंडाऱ्यातील घटनेने पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरही हळहळला; म्हणाला…

आग विझवताना गॅस सिलेंडरचा स्फोट; अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी

आई-वडील शेतकरी असल्यानं त्यांचं दुःख जवळून पाहिलं; लग्नानिमित्त घेतला स्तुत्य निर्णय

येत्या 10 दिवसांत राज्यातील सर्व महाविद्यालयं सुरु करण्याबाबत निर्णय घेणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या