बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागपुरातील शाळांकडून पालकांना फी भरण्यास सक्ती; पालकांकडून आंदोलनाचा इशारा

नागपूर | कोरोनाचं संकट असताना कोणत्याही शाळेने पालकांकडून फी मागू नये. तसेच फीसाठी कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मात्र तरीही नागपुरातील काही नामांकित शाळेकडून पालकांना शाळेची फी भरण्यासाठी मॅसेज येत आहेत. तसेच पुस्तक खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने पत्र काढून शाळांनी कुठल्याही पालकाकडून शैक्षणिक शुल्कासह इतर शुल्क घेऊ नये असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. मात्र सरकारच्या या पत्राला न जुमानता काही शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्याचे संदेश पाठविण्यास सुरू केले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

काही सीबीएसई शाळांकडून पुस्तक आणि स्टेशनरी खरेदी करण्यासाठी पालकांना संदेश पाठवले जात आहे. मात्र काही जागरुक पालक परिषदेनं शाळांच्या या भूमिकेला विरोध केला आहे.

दरम्यान, शाळांनी फी आणि पुस्तकांसाठी आग्रह केल्यास आंदोलनाचा इशाराही पालकांनी दिल्याचं माहिती आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ, गेल्या 24 तासांत तब्बल इतक्या जणांना कोरोना!

आनंदाची बातमी… 6 वर्षीय चिमुरडीची आणि 66 वर्षीय वृद्धाची कोरोनावर यशस्वीरित्या मात!

महत्वाच्या बातम्या-

भारतीयांच्या क्षमतेवर माझा विश्वास, देश पुन्हा विकासाच्या मार्गावर परतेल- नरेंद्र मोदी

…म्हणून 48 तासांसाठी रायगड जिल्ह्यात संचारबंदी, पालकमंत्री आदिती तटकरेंची घोषणा

लोकांकडे पैसेच नाहीत तर उत्पादन केलेल्या वस्तू कोण घेणार?; पृथ्वीबाबांचा मोदींना सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More