बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट राज्यात सक्रीय, ‘इतके’ रूग्ण आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ

नागपूर | काही दिवसांपुर्वी भारतात ओमिक्रॉनचा सबव्हेरिएंट सापडल्याची माहिती इस्राइल शास्त्रज्ञांनी दिली होती. B.A.2.75 असे या सबव्हेरियंटचे नाव आहे. भारताच्या एकूण 10 राज्यांत दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ओमिक्रॉनच्या सबव्हेरिएंटची प्रकरणं आढळली आहेत. आता यात महाराष्ट्र आघाडीवर असून एकट्या नागपूरात 37 रुग्ण आढळले आहेत.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना एकीकडे, ओमिक्रॉनच्या सबव्हेरिएंटचा (B.A.2.75) विषाणूचा धोका वाढला आहे. या सबव्हेरिएंटचे नागपूरात 17 रुग्ण वाढले आहेत. राष्ट्रीय पर्यावरण आभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (NEERI) जनुकीय चाचणी प्रयोगशाळेत हे नमुने तपासण्यात आले.

राज्यात B.A.2.75 या सबव्हेरिएंटचे 37 रुग्णांपैकी 20 नागपूर विभागातील असून 17 नागपूर जिल्ह्यातील आहेत. नागपूरातील नीरीच्या प्रयोगशाळेत ओमिक्रॉनच्या या सबव्हेरिएंटच रुग्णांचे नमुने 15 जून ते 5 जुलै या कालावधीत आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये 11 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. विशेष महत्वाची बातमी अशी की, या रुग्णांपैकी 17 जनांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलीली आहे.

मागील काही दिवसांत शहरात आणि जिल्ह्यात दररोज शंभराच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. दिवसभर जिल्ह्यात 1 हजार 524 आणि ग्रामीणमध्ये 448 अशा एकूण 1 हजार 972 चाचण्या झाल्या आहेत. सध्या शहरात 443 आणि ग्रामीणमध्ये 200 असे जिल्ह्यांत 643 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. 18 जणांना लक्षणे असल्याने ते मेयो, मेडीकलसह इतर शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. तर लक्षणे नसलेले 625 जण गृह विलगीकरणात आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘…तर नव्या चिन्हाचीही तयारी ठेवा’, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आणखी खालावली, महत्त्वाची माहिती समोर

मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट, शिंदे गटाच्या आमदारांना राग अनावर

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More