माझी नाही तर कुणाचीच नाही म्हणत त्यानं स्वतःचा गळा चिरला!

नागपूर | तरुणीचा साक्षगंध झाल्यामुळे 22 वर्षीय तरुणाने स्वतःचा गळा चिरलाय. नागपूरच्या टेलिफोननगर चौकात भरदिवसा ही धक्कादायक घटना घडली. 

संदीप वासनिक असं याप्रकरणातील युवकाचं नाव आहे. त्याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र तिचा साक्षगंध झाल्याने संतप्त झालेल्या संदीपने तिला टेलिफोननगर चौकात गाठले आणि तू माझी नाही झाली तर कुणाचीच नाही होणार, असं म्हणत स्वतःवर ब्लेडने वार करण्यास सुरुवात केली. तरुणीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्यावरही ब्लेडने वार केले. 

दरम्यान, सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.