बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विद्यार्थ्यांना जीवन विमा व अपघात विमा संरक्षणासह परीक्षा शुल्क माफी; ‘या’ विद्यापीठाचा मोठा निर्णय

नागपूर | गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांवरही मोठ्या प्रमाणात बंधनं आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच शिक्षणही ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहे व परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत अनेक जण सापडले आहेत. त्याचाच विचार करून नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी जीवन विमा, अपघात विमा संरक्षण तसेच पूर्ण परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घोषित केला आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफी देत विद्यार्थ्यांसाठी विमा संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने नागपूर विद्यापीठाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, यामुळे विद्यापीठात शिकणाऱ्या तब्बल 04 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

14 मे रोजी नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर संदीप जोशी, भाजपच्या शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, यासह इतरही मागण्या केल्या होत्या. त्यावर सकारात्मक विचार करून विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं समजत आहे. विद्यार्थी हिताचा हा निर्णय घेणारं नागपूर विद्यापीठ हे राज्यातील पहिलं विद्यापीठ ठरलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“भाजपचा एकही आमदार फुटला नाही, म्हणूनच दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न”

15 पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत भाजपविरोधी आघाडीसाठी शरद पवार आज घेणार महत्वाची बैठक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपण्यास राज्यसरकार सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सुचना

मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नाही, म्हणून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा गृहविभागाला ई- मेल अन्…

शिवसेना भाजपसोबत जाणार नाही- बाळासाहेब थोरात

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More