नागपूर महाराष्ट्र

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा पुन्हा हैदोस; वाहनांची जाळपोळ केली

गडचिरोली | गडचिरोलीतील हल्ला ताजा असतानाच आता नक्षलवाद्यांनी आणखी एक कुरापत केली आहे. एटापल्ली गावात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली आहे.

रविवारी नक्षलवाद्यांनी मध्यरात्री गाड्यांची जाळपोळ करुन लाखो रुपयांचं नुकसान केलं आहे.

प्रधानमंत्री सडक योननेमार्फत रस्त्याची कामं सुरु होती. त्यावेळी रोडरोलर, पाण्याचा टँकर, दोन मिक्सर मशीन आणि इतर साहित्य नक्षलवाद्यांनी केलेल्या जाळपोळीत जळून खाक झाले आहे.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी सकाळी पंचनामा केला असून अधिक तपास सुरु असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-26/11 च्या हल्ल्यावेळी विलासराव देशमुख मुलाच्या चित्रपटासाठी धडपडत होते- पियुष गोयल

बंद होणार होती चाराछावणी; शरद पवारांनी चर्चा केल्यानं तूर्तास स्थगिती

-देशभक्तीची प्रमाणपत्र मोदींनी वाटू नयेत; राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

-रिलायन्सचा मुंबईला रामराम; पाच कार्यालये हलवली गुजरातला

-राधाकृष्ण विखें पाटलांनी घेतली गिरीश महाजनांची भेट; भेटीमागचं ‘हे’ दिलं स्पष्टीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या