Top News आरोग्य कोरोना नागपूर

नागपूरात आता मास्क न वापरल्यास भरावा लागणार इतका दंड!

नागपूर | राज्यात सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. यासाठी राज्य सरकारने नागरिकांना बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणं बंधनकारक केलं असून दंडही आकारण्यात येतो. मात्र तरीही अनेकजण या नियमाला जुगारत नसल्याने दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे.

“सोशल डिस्टंसिंग तसंच मास्क घालण्याचे नियम लागू करून दिले आहेत. वारंवार आदेश देऊन देखील नागरिक जुमानत नसल्याचं दिसून आलंय. मास्क घालण्याची पद्धत अजूनही नागपूरकरांनी लावून घेतलेली नाही. त्यामुळे आता दंडाची रक्कम 200 रूपयांहून थेट 500 रूपये करण्यात आली असल्याचं,” राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

विभागीय आयुक्तालयात रविवारी कोरोनासंदर्भातील आढावा बैठक घेतल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी गृहमंत्र्यांनी मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

दरम्यान नागपूरात कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊन करण्यात यावं अशी मागणी केली जात होती. मात्र पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार नाही हे स्पष्ट केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

विरोधकांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही- रोहित पवार

“शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची सीबीआय चौकशी नाही, बदनामीसाठी काहींनी कंगणाच्या मुद्द्याचं पिल्लू सोडलं”

महापौर किशोरी पेडणेकरांनी मुंबईकरांसमोर जोडले हात, म्हणाल्या…

देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला- केंद्रीय आरोग्यमंत्री

पुण्याचा अभिमानास्पद चिराग!; जेईई मेन्समध्ये पटकावला बारावा रँक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या