बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागपूरच्या वेल ट्रीट कोरोना रुग्णालयाला आग; 4 जणांचा मृत्यू

मुंबई | मुंबईतील भांडुपमधील ड्रीम मॉलला लागलेल्या आगीत कोविड सेंटरही जळून खाक झालं होतं. या आगीमध्ये 10 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आता अशीच एक घटना नागपूरच्या वेल ट्रीट कोरोना रुग्णालयात घडली आहे. नागपूरच्या वेल ट्रीट कोरोना रुग्णालयाला आग लागल्याची घटना नागपुरात घडली आहे.

शाॅट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागली तेव्हा या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार चालू होते. आग लागल्यानं सगळीकडे मोठा गोंधळ उडाला. रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या आगीत काहीजण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयातील 20 जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. या रुग्णालयात 50 रुग्ण उपचार घेत होते. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर असलेल्या आयसीयूमध्ये ही आग लागली आहे. 30 बेडची क्षमता असलेलं हे रुग्णालय होतं, परंतु वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे 50 रुग्णांवर या ठिकाणी उपचार चालू होते.

दरम्यान, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली आहे. या घटनेत त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर संबंधित विभागाकडून लवकरात लवकर चौकशी केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.तर चौकशी नंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या–

जम्बो कोविड सेंटर खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र कडक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, राज्य सरकार कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत

धक्कादायक! ‘या’ काँग्रेस आमदाराचं कोरोनामुळे निधन

डिविलिअर्सच्या झंझावातापुढे मुंबई निष्प्रभ, अटीतटीच्या सामन्यात RCBचा विजय

‘त्या’ चेंडूनं केला विराट कोहलीचा घात, उजवा डोळाच केला लाल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More