बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सैराटनंतर नागराज मंजुळेंचा ‘हा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; आकाश ठोसर मुख्य भूमिकेत

मुंबई | नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेमासृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. सैराट सिनेमावर सर्व स्तरातून प्रेम करण्यात आलं. सैराट हा मराठी चित्रपट क्षेत्रातील मैलाचा दगड ठरला आहे. फॅंड्री, नाळ, सैराट या तीन चित्रपटानंतर आता नागराज मंजुळे यांनी आपल्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.

आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे या जोडीवर राज्यानं प्रचंड प्रेम केलं आहे. आता हीच जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ हा आगामी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत. सयाजी शिंदे आपल्या सदाबहार कलाकारीचं प्रदर्शन करणार आहेत.

नागराज मंजुळे आणि झी स्टुडीओ या चित्रपटाची निर्मीती करत आहेत. आकाश ठोसरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घर बंदूक बिरयानी चांगभल म्हणत पोस्टर टाकलं आहे. सिनेमाचे संवाद आणि पटकथा नागराज मंजुळे आणि हेमंत अवताडे यांनी लिहीली आहे. चित्रपटाला संगीत ए.व्ही प्रफुल्लचंद्र यांनी दिलं आहे. 2022 साली हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, नागराज मंजुळे यांनी सलग तीन हिट चित्रपट दिले आहेत. सैराटची ख्याती तर जगभर पोहचली होती. नागराज मंजुळे यांनी आकाश ठोसरला चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख दिली आहे.

थोडक्यात बातम्या 

केरळमध्ये पावसाचा हाहाकार! भूस्खलनात शेकडो नागरिक दबल्याची भीती तर 26 जणांचा मृत्यू

T-20 वर्ल्ड कपला धमाकेदार सुरूवात; ‘या’ देशाने पहिला सामना 10 गडी राखून जिंकला

“भाजपने बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेब देखील बेईमान झाले नसते”

‘आठवण करून देतोय, बाप बाप असतो!’; रामदास कदमांच्या बॅनरबाजीने सर्वांच्या भुवया उंचावल्या

“निर्णय तर मोदींचा होता पण, त्यामागे डोकं कोणाचं होतं?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More