नालायक लोक सगळ्या जातीत असतात…- नागराज मंजुळे

नालायक लोक सगळ्या जातीत असतात…- नागराज मंजुळे

मुंबई | नालायक लोक सगळ्या जातीत असतात, शोषक ही प्रवृत्ती आहे, असं मत चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं आहे. ते एबीपी वृत्तवाहीनीच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते. 

माझा चित्रपट सगळ्यांना आवडत असेल तर त्याचं कारण आहे की ते त्यांचं जगणं आहे. तो बहुजनांचा चित्रपट आहे, असं त्यांनी सांगितलं.

मी फक्त सामाजिक चित्रपट करतो हे अर्धसत्य आहे. आयुष्यात काय करायचंय हे मला कधीच कळलं नाही, पण काय करायचं नाही ते मात्र कळलं, असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, आयुष्यात जे ठरवलं ते झालं नाही आणि ज्याची कल्पना केली नाही ते घडत गेलं, पण सिनेमा कायमच पॅशन असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूरसह 7 जणांवर आरोप निश्चित!

-भाजपला मोठा धक्का; भाजपमध्ये नेत्यांची बंडखोरी

-पप्पा माझी जीभ घसरली, पण मला त्यांच्याबद्दल असं बोलायचं नव्हतं- प्रणिती शिंदे

-खासदार बनसोडेंबद्दल आम्हाला आदर आहे, प्रणिती चुकून बोलली- सुशिलकुमार शिंदे

-सारा अली खानच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Google+ Linkedin