झाडांबद्दल सहवेदना, खिळेमुक्त झाडांसाठी पुण्यात अनोखा उपक्रम

पुणे | झाडांबद्दल सहवेदना व्यक्त करण्यासाठी पुण्यात एक अनोखा उपक्रम राबवला जातोय. खिळेमुक्त झाडे #NailFreeTree #PainFreeTree असे या उपक्रमाचे नाव आहे. 

अंघोळीची गोळी संस्थेतर्फे हा उपक्रम राबवला जातोय. पहिल्या टप्प्यात जेएम रोडवरील झाडांना खिळेमुक्त केले जाणार आहे.

झाडांना खिळे मारणे, दोरी किंवा तारांनी बांधणे यामुळे त्यांचे आयुष्य कमी होतं असं समोर आलंय. या चळवळीमुळे झाडांच्या वेदना कमी होतीलच, शिवाय ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ उपक्रमालाही हातभार लागेल, असं ‘अंघोळीची गोळी’चे माधव पाटील यांनी सांगितले. 

ग्रीनलाईफ फाऊंडेशन आणि सेवक फाऊंडेशन या संस्थाही या उपक्रमात सहभाग घेतला.८७९६५७२७६६ किंवा ९९७५६६०९२२ या क्रमांकावर संपर्क करुन पुणेकरांना या उपक्रमात सहभाग नोंदवता येईल.