Top News पुणे महाराष्ट्र

“आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणं?, हे केंद्र सरकारला शोभत का?”

पुणे |  प्रजासत्ताक दिनानंतर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण आलं. त्यानंतर केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांविरोधात काही ठाम पावलं उचलली. यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

शेतकरी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत असताना तुम्ही खिळे ठोकता? ही पद्धत आहे का? आंदोलक काय पाकिस्तान, चीन, बांगलादेशमधून आलेत का? असा सवाल अजित पवारांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत असून, त्यावेळी मत मांडायला कोणी रोखलं होतं. परदेशी सेलिब्रेटींनी आंदोलनावर बोलणे हा त्यांचा अधिकार असून त्यात गैर काहीच नाही. काळीमा फसणाऱ्या घटना जगात काही ठिकाणी घडतं असतील. तर त्यावर बोललं जातेच ना, असंही पवार म्हणाले.

दरम्यान, कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या 70 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या केंद्र सरकारबरोबरच्या 11 फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. तरीही शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याबाबत शेतकरी ठाम आहेत. त्यांच्या या मागणीवर सरकार तोडगा काढणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…हे पहिले केंद्राला सांगा’; अजित पवारांनी फडणवीसांना फटकारलं

‘तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण आता…’; या मराठी दिग्दर्शकाने सचिनला सुनावलं

“शेतकऱ्यांप्रमाणे आक्रमक झाल्यावरच मराठा समाजाचे ऐकणार का?”

“आंदोलक शेतकरी देशद्रोही मग अर्णब गोस्वामी, आणि कंगणा राणावत देशप्रेमी आहेत का?”

“भाजपच्या नेत्यांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे”

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या