झोपेच्या गोळ्या देऊन मित्राच्या 18 वर्षीय मुलीवर बलात्कार

नालासोपारा | झोपेच्या गोळ्या देऊन एका नराधमाने आपल्या मित्राच्या 18 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. संजीवन चौधरी असं या नराधमाचं नाव असून वालीव पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात.

पीडित मुलीला डोकेदुखीचा त्रास होता, याच संधीचा गैरफायदा घेऊन संजीवनने तिला डोकेदुखीच्या नावाखाली झोपेच्या गोळ्या दिल्या आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मार्च ते डिसेंबर या काळातही त्याने तिच्यावर अत्याचार केले.

धक्कादायक बाब म्हणजे या संबंधातून पीडितेने एका मुलालाही जन्म दिलाय. संजीवन आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याने आपण या प्रकाराची वाच्यता केली नाही, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय.