मुंबई | अंबानींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं होतं. रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी आजोबा आणि पत्नी नीता अंबानी आजी झाल्या. त्यांच्या या नव्या पाहुण्याचा नामकरण सोहळा झाला आहे.
अंबानी कुटुंबाच्या नव्या वारसदाराचं पृथ्वी असं नाव ठेवण्यात आलं आहे. 10 डिसेंबरला पृथ्वीचं आगमन झालं होतं. भगवान श्रीकृष्णाची कृपा आणि आशीर्वादांमुळे श्लोका आणि आकाश अंबानी यांच्या मुंबईतील घरी मुलाने जन्म घेतला अशी घोषणा अंबानी कुटुंबाने केली होती.
भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने धीरुभाई अंबानी यांच्या आशीर्वादांनी कोकिलाबेन अंबानी यांना पृथ्वी आकाश अंबानीच्या जन्माची घोषणा करताना आनंद होत आहे. बाळाचे आई-बाबा श्लोका आणि आकाशही आनंदी आहेत.
बाळाच्या नावाची घोषणा करताना आजी-आजोबा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी तसेच मोना आणि रसेल मेहता अत्यंत खुश आहेत असं अंबानी कुटुंबातर्फे बाळाचं नाव जाहीर करताना लिहिण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
त्रास होत असल्यास शिवसेना सोडून भाजपमध्ये या; राजन यांना खुलं निमंत्रण
…तर फडणवीस-मोदींशी चर्चा करून तोडगा काढू’; ‘या’ माजी मंत्र्याने अण्णांना केली विनंती
कोरोनाचा मोठा फटका; रिंकू राजगुरु अडकली या संकटात!
…तर नरेंद्र मोदी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील- राहुल गांधी
औरंगाबादमधील विचित्र घटना! कोरोना होऊन गेलेल्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार