Top News देश राजकारण

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी धोका, असं म्हणत शेतकरी बाप-लेकानं संपवलं आयुष्य

Photo Curtacy- Rajyasabha TV. video Screen Shot

चंदीगड |  गेल्या काही महिन्यांपासून देशभरात शेतकरी आंदोलन चालू आहे. तर मागील काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठिय्या देऊन बसले आहेत. शेतकरी आंदोलनला 87 दिवस पुर्ण झाले तरी, नवीन शेतीविषयक कायद्यावर तोडगा निघाला नाही. यादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा आंदोलना वेळी मृत्यू झाला आहे तर काही शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे. होशियारपूरमधील एका शेतकऱ्याने सुसाईड नोटमध्ये त्याच्या मृत्यूला मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे.

होशियारपूर जिल्ह्यातील मुहद्दीपुर गावात राहणाऱ्या जगतार सिंग आणि त्याचा मुलगा कृपाल सिंग या पिता-पुत्राने राहत्या घरी आत्महत्या केली. त्या ठिकाणी एक सुसाईड नोट सापडली असून त्यात मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे. सरकारने कर्जमाफी न केल्याने ही आत्महत्या करत असल्याचं यात लिहिलं आहे. मोदी सरकार बरोबरच कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारचंही नाव या सुसाईड नोटमध्ये आलं आहे.

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी धोका आहे. सरकार शेतकऱ्यांचा आवाज ऐकत नाही. नवीन शेतीविषयक कायदे शेतकऱ्यांना नुकसान करत आहेत. कॅप्टन सरकारने देखील कर्ज माफ केलं नाही, याला कंटाळून आत्महत्या करत आहोत, असे सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. ती सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. वडील आणि मुलावर एकूण 6.50 लाख रूपयांचं कर्ज होतं, असं मोठ्या भावाने सांगितलं आहे.

जगतार सिंग आणि त्यांच्या दोन मुलांच्या नावावर 3 एकर जमिन होती. मोठा मुलगा वेगळा राहत असल्याने कर्जाचा ताण वडील आणि लहान भावावर आला. या दोघांना उस्मान शहीद मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडून नोटीस आल्याचं मोठ्या भावानं सांगितलं आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान आतापर्यंत 200 हून अधिक शेतकऱ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यु झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड काय म्हणाले?, वाचा जसंच्या तसं…

राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळाची रुपाली चाकणकरांनी उडवली खिल्ली

लाईट्स… कॅमेरा… अ‌ॅक्शन…. धाड टाकताच समोरील प्रकार पाहून पोलीसही हादरले!

कोरोना नेत्यांची पाठ सोडेना, आता ‘या’ बड्या नेत्याचीही टेस्ट पॉझिटिव्ह

“चालक कार चालवत होता आणि धावत्या कारमध्ये मालक बलात्कार करत होता”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या