पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट; विधानपरिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावं जाहीर
मुंबई | विधानपरिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नावाचा समावेश नाहीये आणि पंकजा मुंडेंसाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
दरम्यान, आमच्या पार्टीत आम्ही सर्व जण कोऱ्या पाकीटासारखे असतो. जो पत्ता लिहिल तिकडे जात असतो. राजकीय कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते पण निर्णय शेवटी संघटना करते. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेच्या उमेदवारांचा निर्णय केंद्रातून होतो. पंकजा ताईंच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले पण केंद्राने काही भविष्यातला विचार केला असेल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणालेत.
गेल्या काही निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. यंदाही त्यांच्या नावीची जोरदार चर्चा होती, पण त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता पंकजा मुंडे यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 94.22 टक्के
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर, आघाडीचं मतांचं गणित बिघडलं?
“मविआचे चारही उमेदवार निवडून आणा, निवडणूक झाल्यावर आपण पुन्हा भेटू आणि पार्टी करू”
डायबिटीस असणाऱ्या पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
रेल्वेने भंगार विकून केली ‘इतक्या’ कोटींची कमाई!
Comments are closed.