Farmer Scheme l महाराष्ट्र सरकारने पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपयांचे अनुदान दिले जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना पाच हप्ते मिळाले असून, सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा अद्याप सुरूच आहे.
पीएम किसान आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला :
केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. या हप्त्यात देशभरातील 9.75 कोटी शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळाले. तसेच, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा 3000 रुपयांचा हप्ता 7 मार्चपर्यंत जमा करणार असल्याचे जाहीर केले.
मात्र, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्रातील 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. राज्य सरकारने आतापर्यंत 9000 कोटी रुपये या योजनेसाठी खर्च केले आहेत.
Farmer Scheme l सहाव्या हप्त्याबाबत घोषणा कधी होणार? :
या योजनेचा मागील हप्ता ऑक्टोबर महिन्यात वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आला होता. तेव्हापासून पाच हप्ते मिळाले असून, आता सहाव्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांचे डोळे राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले आहेत.
दरम्यान, पीएम किसान योजनेचे पैसे वेळेवर मिळतात, मात्र राज्य सरकारच्या योजनांबाबत विलंब होतो, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. शासनाकडून लवकरच सहाव्या हप्त्याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.