बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपच्या काळ्या जादूचा आमच्यावर प्रभाव पडणार नाही”

भंडारा | राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरूद्ध भाजप (BJP) वाद आता शिगेला पोहोचला आहे. राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपची सत्तेवर काळी नजर आहे, असा खोचक टोला नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे.

जे सत्तेचे पिपासू आहेत त्यांची सत्ता गेल्याने जी तडफड सुरू आहे त्या तडफडेचा हा आवाज आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांची बरोबरीची भागिदारी आहे. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार सुरू आहे. कोरोनामुळे हा अजेंडा राबवता आला नाही तो आता राबवणं सुरू झालं आहे आणि विरोधकांना याचाच त्रास होत आहे, असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे.

अफवा उडवून सरकारमध्ये मतभेद निर्माण केला जात आहे. पण यांच्या काळ्या जादूचा फरक पडणार नाही. त्यांची सत्तेवर काळी नजर आहे. पण या काळ्या जादूचा प्रभाव पडणार नाही, असा घणाघात नाना पटोलेंनी केला आहे. तर हे सरकार पाच वर्ष चालेल, असा विश्वास देखील नाना पटोले यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवरूनही नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकरावर ताशेरे ओढले होते. ओबीसी (OBC) समाजाच्या मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत पण भाजप सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या अन्यायाविरूद्ध पेटून उठण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“सुशिक्षित हिंदू मुलीच मुस्लिम मुलांना पळवून नेतात”

महाराष्ट्रावर आणखी एक संकट, पुढचे पाच दिवस महत्त्वाचे

नितीन गडकरींचं काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले…

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, सलग सहाव्यांदा पेट्रोल महागलं; वाचा ताजे दर

ipl 2022: हार्दिकची गुजरात टीम राहुलच्या लखनौवर भारी, रंजक सामन्यात गुजरातचा दणदणीत विजय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More