नाना पाटेकरांना बेड्या ठोका; महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या तनुश्रीच्या पाठीशी

मुंबई | अभिनेता नाना पाटेकर यांना बेड्या ठोका, अशी मागणी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. तनुश्री दत्ताला पाठींबा देण्यासाठी काँग्रेस महिला रस्त्यावर उतरल्या आहेत.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकरांवर लावलेल्या अश्लिल वर्तनाच्या आरोपांनंतर तनुश्रीने रितसर पोलिसात तक्रार नोंदवली होती. नानांसह तिघांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्याच्या बाहेर आंदोलन करून अटकेची मागणी केली आहे.

दरम्यान, तब्बल 5 तास जवाब नोंदवल्यानंतर आयपीसी कलम 354 आणि 509 अंतर्गत नाना, गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग, निर्माते सामी सिद्दकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | ‘या’ प्रसिद्ध कर्णधारावर एअर होस्टेसचा विनयभंगाचा आरोप

-बाळासाहेब असते तर कमळाबाईसोबतचे संबंध कधीच तोडले असते!

-मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही!

-#MeToo | सलमान खानने माझा मानसिक छळ केला!

-#MeToo | आमिर खानचा मोठा निर्णय; त्या व्यक्तींसोबत काम करणार नाही!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या