Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांना ‘मी टू’ प्रकरणात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) यांनी दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने ती फेटाळून लावली. पुरावे अपुरे असल्याचे नमूद करत कोर्टाने हा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे.
पुराव्याअभावी तनुश्री दत्ताची याचिका फेटाळली
तनुश्री दत्ता यांनी नाना पाटेकर आणि अन्य तिघांविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात विनयभंग आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर न्यायाधीश निलेश बन्सल यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. नाना पाटेकर यांच्यावतीने ऍड. अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. सुनावणीत मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टचा आधार घेत न्यायालयाने तक्रार फेटाळली, कारण पुरेशा पुराव्यांअभावी आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.
2008 मध्ये दाखल करण्यात आला होता गुन्हा
तनुश्री दत्ता यांनी 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य (Ganesh Acharya), दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. (Nana Patekar)
ऑक्टोबर 2018 मध्ये तनुश्री यांनी ही तक्रार पुन्हा दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, नाना पाटेकर यांनी त्यांना गैरवर्तनाची वागणूक दिली आणि शूटिंगदरम्यान अनुचितरित्या स्पर्श केला. मात्र, पोलिसांच्या चौकशीत कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. डिसेंबर 2019 मध्ये तनुश्री यांनी न्यायालयात निषेध याचिका दाखल केली होती, पण आता अंधेरी न्यायालयाने नाना पाटेकर यांना मोठा दिलासा दिला आहे.
Title : Nana Patekar Gets Relief in ‘Me Too’ Case
“माझी छाती तिच्याएवढी…”, स्वतःच्या ब्रेस्टबद्दल नीना गुप्ता हे काय बोलून गेल्या?