Loading...

‘आपला माणूस’ नाना पाटेकर पूरग्रस्तांच्या मदतीला; 500 घरं बांधून देणार

कोल्हापूर |  ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळच्या पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यांच्या व्यथा समजावून घेतल्या. नाम फाऊंडेशनकडून शिरोळ तालुक्यात 500 घरं बांधून देण्याचा निर्णय नाना पाटेकर यांनी जाहीर केला आहे.

सरकारने रमाई योजना, इंदिरा आवास योजना आणि पंतप्रधान घरकुल योजनेच्या अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी नाना पाटेकर यांनी केली. योजनांद्वारे घरकूलासाठी दिला जाणारा निधी आणि अनुदान सरकारने अदा करावा. उरलेले पैसे नाम टाकेल, असं नाना म्हणाले.

Loading...

नाना आज कोल्हापुरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे. त्यांच्याकडून मदतीसंदर्भातील गोष्टी जाणून घेणार आहेत.

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद मला पहायचाय, अशा भावना नानांनी व्यक्त केल्या. नाना नेहमी समाजकार्यात पुढे असतात. गेल्या वर्षी त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम केलं होतं.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-राधा झाली सौमित्रसाठी बावरी…. दिला लग्नाला होकार

-महिला क्रिकेटपटूनं शेअर केला न्यूड फोटो; म्हणते…

-बाळासाहेब थोरातांच्या ‘त्या’ प्रश्नावर भारत भालके झाले निरूत्तर

Loading...

-मलिकजी, काश्मिर खोऱ्यात कधी येऊ ते सांगा; राहुल गांधींचा पुन्हा चिमटा

-रो’हिट’ शर्मा आज सिक्सर किंग युवीचा हा ‘खास’ विक्रम मोडणार??

Loading...