फडणवीस कमालीचा माणूस, पवार माईक असतानाही मोठ्याने बोलतात!

मुंबई | फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता? असा मनसेला सवाल करतानाच अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलं. तर दुसरीकडे पवारांवर मात्र टीकास्त्र सोडलं. मुंबईतील व्हीजेआयटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मी परवा देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत पाहात होतो. कमालीचा माणूस आहे. काय काम केलं, कुठं चुकलं? शांतपणे सांगत होते. नाहीतर पवार माईक असतानाही मोठ्याने बोलतात, असं नाना म्हणाले.

मी कोणत्याच पक्षाचा नाही, भाजपचा प्रवक्ता नाही, मात्र असाच सीएम आपल्याला हवा आहे, असं नाना पाटेकर म्हणाले.