शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता पाणी नाही, कारण ते पूर्णपणे आटलंय!

पणजी | राज्यातील शेतक-यांचे दु:ख दिसून येत नाही. त्यांच्या डोळ्यातही पाणी दिसणार नाही, कारण ते पूर्णपणे आटलेले आहेत, अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. बायोस्कोप व्हिलेजमधील कट्ट्यावर ते बोलत होते.

नाम फाऊंडेशनचा उद्देश समाजासाठी काहीतरी करण्याचा आहे. आपण भाजपचा प्रचार करीत नाही, पण केंद्र आणि महाराष्ट्रातील सरकार शेतक-यांसाठी काहीतरी करतेय आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले पाहिजे, असं नाना यावेळी म्हणाले.

दरम्यान, पुरस्कार हे बत्ताशाप्रमाणे असतात. तेवढ्यापुरते गोड लागतात. त्यांनी पोट भरत नाही, असं नाना पाटेकर यांनी सांगितलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या