भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता?

मुंबई | भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता?, असा सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनी मनसेला विचारला आहे. ते मुंबईतील व्हीजेआयटी इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मला वाटतं यामध्ये फेरीवाल्यांची काहीच चूक नाही. दोन वेळच्या भाकरीसाठी ते काम करणाराच. आपण त्यांची भाकरी हिरावून घेऊ शकत नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर नानांनी पालिकेला जबाबदार धरलं. प्रशासनाने त्यांना आतापर्यंत का जागा दिली नाही? आपण तरी विचारलं का? म्हणजे आपणही याला जबाबदार आहोत, असं नाना म्हणाले.