#MeToo | नाना पाटेकरांनी महिला आयोगाकडे पाठवली 3 पानं; नेमकं काय लिहिलंय?

मुंबई | #MeToo प्रकरणात अडकलेले अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाला 3 पानी लेखी उत्तर पाठवलेलं आहे.

या लेखी उत्तरात पाटेकर यांनी तनुश्री दत्ताने लावलेले सर्व आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

या प्रकरणाची नोंद पोलिसात झाली असून पोलीस आपलं काम करत आहेत. त्यामुळे मी याबद्दल अधिक माहिती देऊ शकत नाही, असं पाटेकर यांनी पत्रात लिहलं आहे.

दरम्यान, नाना पाटेकर यांनी 10 वर्षापूर्वी माझ्यासोबत गैरवर्तन केलं होतं, असा आरोप  अभिनेत्री तनुश्री दत्ताने लावला होता. त्यानंतर #MeToo ची अनेक प्रकरणं समोर येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेसमध्ये पाय ओढण्याची स्पर्धा? राजीव सातव लोकसभा लढणार नाहीत???

-‘गनिमी काव्या’ने शबरीमलाला परत येऊ; तृप्ती देसाईंचा इशारा

-पुण्याला एक नंबरचं शहर बनवणार; देवेंद्र फडणवीसांंचं आश्वासन

-बारामतीच्या न्यायालयाकडून राज ठाकरे यांना दिलासा!

-विरेंद्र सेहवागनं महिला क्रिकेटसंघाला दिला ‘हा’ कानमंत्र