राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं!

पुणे | राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची टिंगल केल्यानंतर संतप्त झालेल्या नानांनी मनसेला मत न देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला, मी माझा मुद्दा मांडला. यामध्ये राज यांचं वैयक्तिक नुकसान नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं, असं नाना पाटेकर यांनी म्हटलंय. 

मनसेच्या फेरीवालाविरोधी आंदोलनानंतर नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतली होती. त्यावरुन राज यांनी जाहीर सभेत नानांची मिमिक्री केली होती.