Maha Vikas Aghadi | महाविकास आघाडीचा जागावाटपाचा वाद विकोपाला गेला आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यात तीव्र वाद निर्माण झालाय.
संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींचं म्हणजेच उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांबद्दलची नाराजी उघड केली. त्यामुळे, पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे.
आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर
ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून फाटलं आहे. नाना पटोले यापुढे महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित असतील तर ठाकरे गटाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असा इशारा ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिल्याचं कळतंय.
तर दुसरीकडे संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींचं म्हणजेच उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांबद्दलची नाराजी उघड केली.
महाविकास आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेतून काँग्रेस-ठाकरेंच्या शिवसेनेतला विसंवाद भर पत्रकार परिषदेतून चव्हाट्यावर आला आहे. नाना पटोलेंनी मविआच्या नेत्यांसमोरच संजय राऊतांबद्दलची नाराजी जाहीर केली.
Maha Vikas Aghadi | संजय राऊतांची काँग्रेसवर टीका
दरम्यान, आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला होता. महाराष्ट्रातले काँग्रेस नेते सक्षम नाहीत, ते यादी दिल्लीला पाठवतात, त्यानंतर चर्चा होते. आता वेळ निघून गेली आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. तसंच आपलं महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला आणि मुकूल वासनिक यांच्याशी बोलणं झालं आहे आणि राहुल गांधींशी आपण बोलणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
कियाची जबरदस्त फीचर्ससह कार बाजारात लाँच; जाणून घ्या सर्वकाही
अजितदादा गटात नाराजी! दोन्ही रुपालींमध्ये नेमका वाद काय?
अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय; माजी मंत्र्याचं विधान