Top News नागपूर महाराष्ट्र

भाजप खासदार असताना मोदींशी पंगा; आता ‘या’ काँग्रेस नेत्याचं थेट वाराणसीत आव्हान!

Photo Courtesy- Facebook/Narendra Modi

नागपूर | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये नुकतेच मोठे फेरबदल झाले आहेत. पक्षाची कमान माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, त्यामुळे काँग्रेसने कात टाकल्याचं मानलं जातंय. अशातच काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता पुन्हा एकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात शड्डू ठोकले आहेत.

नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढण्याची आपली तयारी असल्याचं म्हटलं आहे, त्यासाठी पक्षाने आदेश देण्याची गरज असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिला तर आगामी लोकसभा निवडणुकीत नाना पटोले थेट वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दोन हात करताना दिसू शकतात.

शेतकरी कायद्यांवरुन नाना पटोले यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं. कृषि कायदे रद्द केल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला. नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा संसदेत प्रवेश करताना संसदेच्या प्रवेशद्वारावर माथा टेकवला होता, तेव्हा हे गरिबांचं सरकार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं, मात्र आता अदानी-अंबानी गरीब आहेत का?, असा सवाल पडल्याचं सांगत त्यांनी मोदींना टोला लगावला.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्तीवरुन त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही लक्ष्य केलं. सरकारनं सूचित केलेल्या सदस्यांची नियुक्ती अडवून ठेवणं योग्य नाही, यासाठी राज्यपालांवर मोदी-शहांचा दबाव आहे का?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

थोडक्यात बातम्या-

5 महिन्यांच्या तीरासाठी देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधानांनीही दाखवली तत्परता!

“नरेंद्र मोदींचे अश्रू मगरीचे, राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का?”

सचिन तेंडुलकरला मोठा धक्का, मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबईकडून डच्चू!

पुण्यातील स्नेहल काळभोर अवघ्या 21 व्या वर्षी झाली सरपंच!

गोल्डनमॅन असणं ठरतंय शाप; ‘या’ चार गोल्डनमॅनला मृत्यूनं अकाली गाठलं!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या