बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् नगरसेवकांच्या वादावरून नाना पटोले आणि अशोक चव्हाणांनी लावला डोक्याला हात

पुणे | काँग्रेसकडून आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीची चांगलीच तयारी सुरू आहे. मात्र, अशातच काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा वाद समोर आला आहे. या नगरसेवकांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये चांगलाच वाद पेटलेला दिसतोय. या नगरसेवकांचा वाद मिटवताना नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांनीच डोक्याला हात लावला आहे.

मुख्यसभेच्या कार्यपत्रिकेवर काँग्रेस नगरसेवकाच्या विरोधात असलेला प्रस्ताव मंजुर करा, आमच्याकडून तीव्र विरोध करण्यात येणार नाही, असं काँग्रेसचा एक नगरसेवक भाजपच्या नगरसेवकाला सांगत असलेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जोरदार वादाला सुरूवात झाली. या दोघांना मदत करण्यासाठी सत्तेत असणाऱ्या भाजपने मुख्यसभा तहकुब करत येणारा प्रस्ताव टाळला.

पुणे महानगरपालिकेची बुधवारी मुख्यसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे गटनेेेेेेेेेेेेेेेते आबा बागुल यांनी बांग्लादेशात मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करत यावर केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, अशी तहकुबी मांडली. यामुळे मुख्यसभा अचानक तहकुब करण्यात आली. मात्र, हे अनेक नगरसेवकांच्या लक्षात देखील आले नाही.

दरम्यान, काँग्रेसच्या या दोन नगरसेवकांचा वाद काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापर्यंत गेला आहे. तसेच राज्याचे सार्वजानिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यापर्यंत देखील हा वाद पोहोचला. त्यानंतर अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्याच पक्षातला वाद पाहून अखेर त्यांनी डोक्याला हात लावल्याचं पहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या- 

“राणेंच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, वेळ आली की कुंडली बाहेर काढू”

पेट्रोल-डिझेलचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लॅन, वाचा सविस्तर

अफगाणिस्तानात खळबळ! ‘या’ स्टार खेळाडूची तालिबान्यांकडून हत्या

विराटनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्यात मिळाले संकेत

‘गाव जेवण एक दिवस देणार की तीन वर्षे?’; अशोक चव्हाणांचा खोचक सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More